आम्ही काय करतो?

छलांग हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जो ह्या अगणित संधी असलेल्या जगात तुम्हाला नवशिकेपासून ते तज्ञ होण्याच्या प्रवासात तुमचा सहभागी होतो. आमचं मुख्य उद्देश्य नावीन्य आणि कलात्मक दृष्टिकोन असणारे उद्योजक तयार करणे आहे. ह्या प्रकल्पात आम्ही तुमच्यासाठी उत्तम आणि गुणवत्ता असलेली लेखन सामग्री तयार केली आहे, जी तुम्हाला तुमचा ध्येय पूर्ण करण्यात आणि तुमच्या कौशल्याला अजून उत्तम करण्यास तुम्हाला नक्कीच मदत करेल.

आमच्या सोबत:

तुमच्या पॅशनला ओळख

तुमच्यात असणाऱ्या कौशल्याचे प्रशिक्षण घ्या

एक यशस्वी उद्योजक व्हा

संस्थापक:

THE STRATEGIES

"A leader is one who knows the way, goes the way and shows the way." - John C. Maxwell

आमचा नेतृत्व करणारे तीन तरुण, उत्कट आणि उत्तम दृष्टिकोन असणारे मित्र, देशातील मोठ्या बदलात सहभागिता देण्यासाठी एकमत झाले. आमचा नेत्रत्व करणाऱ्यांचा मुख्य लक्ष असे तरुण जे काही नवीन करण्याच्या कल्पनेत असून, स्वतःला उद्योजक म्हणून ह्या जगात स्थापित करण्याचा विचार करत आहे, त्यांना त्यांच्या ह्या उद्योजकीय प्रवासात सोबती म्हणून साथ देणे आहे.

अमित मोदी

सह-संस्थापक

“ह्यांची मोठी मालमत्ता म्हणजे ह्यांचे मानव संसाधन, लोकांमध्ये गुंतवणूक करणे ह्यांची प्राथमिकता आहे.” जागतिक संस्कृतीतून शिक्षण घेऊन सुद्धा अमित हे आपल्या स्वदेशात आले आणि त्यांची गृह व्यवसायाची जवाबदारी त्यांनी अगदी उत्तम प्रकारे आपल्या खांद्यावर घेतली. एक व्यवसायिक होण्यासोबतच, हे एक उत्तम कूक सुद्धा आहेत…. तर हे आहे छलांगचे Robinhood अमित मोदी.”.

अमित गर्ग

सह-संस्थापक

“व्यवसायाची अगदी बारकाईची माहिती असण्यासोबतच, अमित ह्यांना माहित आहे कि व्यवसाय कसे वडवावे. हे कमी बोलण्यात आणि डोकं जास्त चालवण्यात विश्वास करतात, हेच ह्यांच्या यशाचे रहस्य आहेत. सामान्य कौटुंबिक पार्शवभूमीतून आल्यावर सुद्धा ह्यांनी ह्यांचीच कष्टाणे आणि ह्यांच्या चातुर्याने स्वतःला सिद्ध केलं. तर हे आहे आमच्या छलांगचे Visualiser अमित गर्ग.”

आदित्य मुछाल

सह-संस्थापक

"“प्रयत्न करा आणि काही मोठं करा” आदित्य छलांगचे Technoid हे अखंडता आणि तत्त्वांच्या ताकदीत विश्वास करतात. नाविन्यपूर्ण ब्रँड स्ट्रॅटेजी आखणे असो, जगभर फिरणे असो किंवा मॅरेथॉन धावणे असो, हे सर्व आदित्यच्या कौशल्यात आहेत. त्याच्या अनुभवातून वाचण्याची आणि शिकण्याची त्याची आवड हीच त्याला पुढे वाढण्यास मदत करते. ट्रेंडिंग अपडेट्सद्वारे सर्फिंग करत नसल्यास, ह्यांच्या सोबत जागतिक पातडीवर बिंग करताना बघू शकता.


Copyright The Chalaang | Privacy Policy | Terms of Use | Terms and Condition | Cookies Policy